ShareThis

Saturday, April 25, 2015

विनाशाकडून विकासाकडे...!


काल शुक्रवार, दि. २४ एप्रिल २०१५ रोजी, तेजस नगर आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या उद्घाटनाच्या व्याख्यानासाठी प्रखर पर्यावरणवादी श्री.दिलीप कुलकर्णी यांचे अत्यंत विवेकशील आणि तेवढेच परखड विचार ऐकण्याची आणि सरांशी GDP / GNH वर चर्चा करण्याची सुवर्णसंधी मिळाली. आपले विचार कुणीतरी प्रत्यक्ष आचरणात आणू शकते आहे याचे अप्रूप आणि आंनद आगळाच होता. सरांनी निवांत आणि प्रदीर्घ चर्चेसाठी कुडावळ्याला येवून रहाण्याचे निमंत्रण दिले आहे. बघू या कधी आणि कसे जमते आणि कोण कोण येते…! मूळच्या मेकॅनिकल इंजिनियर असणाऱ्या आणि पर्यावरण रक्षणासाठी आत्मसिद्ध संयमाने 'वनवासी' होऊन आनंद साधना करणाऱ्या या तपस्वीस सलाम…!

No comments:

Post a Comment